मुंबई: महेंद्रसिंग धोनी आणि त्याची पत्नी साक्षीनं सलमान खानच्या घरी भेट दिली. सोमवारी सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमधल्या घरी एका छोट्याशा पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी माही आणि साक्षीबरोबर प्रफ्फुल पटेल यांची मुलगीही होती.
या पार्टीनंतर धोनी दाम्पत्यानी सलमानची बहिण अर्पिता खान आणि तिच्या बाळाचीही भेट घेतली.
मुकेश अंबानींचा मुलगा अनंत अंबानीच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये सलमान आणि धोनीची भेट झाली होती. यावेळी सलमाननं धोनीला आपल्या घरी जेवणासाठी यायचं आमंत्रण दिलं होतं.