दिलीप प्रभावळकरांचं छोट्या पडद्यावर कमबॅक, 18 जानेवारीपासून 'चूक भूल द्यावी घ्यावी'

श्रीयुत गंगाधर टिपरे या अत्यंत गाजलेल्या मालिकेनंतर दिलीप प्रभावळकर पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर कमबॅक करत आहेत.

Updated: Dec 26, 2016, 06:31 PM IST
दिलीप प्रभावळकरांचं छोट्या पडद्यावर कमबॅक, 18 जानेवारीपासून 'चूक भूल द्यावी घ्यावी' title=

मुंबई : श्रीयुत गंगाधर टिपरे या अत्यंत गाजलेल्या मालिकेनंतर दिलीप प्रभावळकर पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर कमबॅक करत आहेत. दिलीप प्रभावळकर आणि सुकन्या मोने यांची चूक भूल द्यावी घ्यावी ही मालिका 18 जानेवारीपासून झी मराठीवर सुरु होत आहे. बुध-शनि. रात्री ९.३० वाजता ही मालिका झी मराठीवर पाहता येणार आहे.

उतारवयात एकमेकांच्या सोबतीने हसत खेळत, सुखी संसाराचं शिखर सर करणाऱ्या एका 'चिरतरुण' जोडप्याची खोडकर गोष्ट या मालिकेमध्ये दाखवण्यात येणार आहे. झी मराठीनं या मालिकेचा नवा प्रोमोही शेअर केला आहे.