मुंबई : दीपिका पदुकोणने विविध प्रकारच्या भूमिका साकारून बॉलिवुडमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अनेक आव्हानात्मक भूमिका तिने आजवर साकारल्या आहेत. आता ती चक्क 20 किलोचं चिलखत परिधान करून प्रेक्षकांसमोर येणार आहे.
संजय लीला भंन्साळीच्या अगामी "बाजीराव मस्तानी" चित्रपटात ती मस्तानीची भूमिका साकारत आहे. मस्तानीच्या साहसी,शूर व्यक्तीमत्वाला न्याय देण्यासाठी 20 किलोचे चिलखत परिधान करून तलवाबाजी करतांना ती प्रेक्षकांना दिसेल. याआधीही "रामलीला" या चित्रपटात तिने 30 किलोचा घागरा परिधान केला होता.