मुंबई: सनी लिऑन स्टारर एक पहेली लिला ही कथा आहे लीला या तरुणीची. राजस्थानच्या एका गावात राहणाऱ्या लीलाचा एक पुनर्जन्म होतो. या जन्मी ती एक ब्रिटीश इंडियन मॉडल म्हणून जन्माला येते. खरंतर हा सिनेमा कुठेतरी शक्ती सामंत यांच्या मेहबुबा या सिनेमावरुन प्रेरित आहे की काय, असं जाणवतं.
सनी लिऑन या सिनेमात गाव की छोरी म्हणून प्रेसेंट झाली आहे. सनीला या रुपात पाहणं, ही गोष्टच पचत नाही. सनीचं सौंदर्य खरं तर यावरच संपूर्ण सिनेमा वसूल करण्यात आलाय. सनीचा अभिनय अतिशय वाईट झाला. एक गावची गोरी तिनं साकारली खरी, पण त्यातील तिचे फिरंगी उच्चार ऐकून खरंच गंमत वाटते.
बॉबी खान दिग्दर्शित एक पहेली लीला सिनेमाचं प्रेसेंटेशन, सिनेमॅटोग्राफी, कला दिग्दर्शन हे सगळं टिपिकल आहे. संजय लीला भंसाळी स्टाईल झालंय. एवढंच काय तर संजय लीला भंसाळी यांच्या सिनेमातलं 'ढोल बाजे' हे गाणं ही एक पहेली लीला या सिनेमात अगदी सनी लिऑन स्टाइल सादर करण्यात आलंय.
सिनेमाचे डायलॉग्स, कलाकारांचे अभिनय, विशेष करुन सनी लिऑनचा अभिनय खरंच खूप भयंकर आहे. केवळ सनीचा बोल्ड लूक आणि बोल्ड सिन्ससाठी हा सिनेमा पाहायला सनीचे चाहते गर्दी करतील यात शंका नाही.
या सिनेमाला आम्ही देतोय अडीच स्टार्स.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.