पूनम पांडेला फेसबुकचा झटका

आपल्या फोटोंमुळे सतत चर्चेत असलेल्या पूनम पांडेला आज सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकने बडा झटका दिला आहे. कारण पूनम पांडेचं फेसबुक पेज डिअॅक्टिव्ह केलं आहे.

Updated: Aug 27, 2014, 10:28 PM IST
पूनम पांडेला फेसबुकचा झटका title=

मुंबई : आपल्या फोटोंमुळे सतत चर्चेत असलेल्या पूनम पांडेला आज सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकने बडा झटका दिला आहे. कारण पूनम पांडेचं फेसबुक पेज डिअॅक्टिव्ह केलं आहे.

प्रसिद्धीसाठी या आधी पूनम पांडेने सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकचा आधार घेतला होता, आणि आपले काही फोटो फेसबुकवर टाकले, यानंतर फेसबुकने हे अकाऊंट बॅन केलं होतं.

अश्लील फोटो टाकल्याने फेसबुक अशा प्रकारे बॅन आणत असल्याचं सांगण्यात येतं. ट्विटरवरही पूनम पांडेच्या अकाऊंटवर असंच बॅन करण्यात आलं होतं, मात्र आक्षेपार्ह फोटो हटवल्यानंतर अकाऊंट पुन्हा सुरू झालं.

आता पुन्हा पूनमचं फेसबुक पेज डिअॅक्टिव्ह करण्यात आलं आहे, पूनमने ट्वीट करून ही माहिती दिली आहे, पूनम आता आपलं पेज कसं अॅक्टीव्ह करता येईल, याचा मार्ग शोधतेय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.