का लग्न करत नाही प्रियंका चोप्रा?

Updated: Aug 27, 2014, 09:27 PM IST
का लग्न करत नाही प्रियंका चोप्रा?

मुंबईः बॉलिवूडची पिकी चॉप्स म्हणजेच प्रियंका चोप्राचा एक नवा चित्रपट 'मेरीकॉम' लवकरच  प्रदर्शित होणार आहे. 

याच चित्रपटाच्या प्रमोशनसाठी प्रियंका चोप्रा आली होती. त्यावेळेस प्रियंकाला पत्रकारांनी प्रश्न विचारला की, ''तू लग्न केव्हा करणार आहे.'' त्यावेळेस प्रियंकाने उत्तर दिले की, ''तुम्ही अभिनेत्यानाही हा प्रश्न करता की नाही?'' 

पुढे ती बोलते की, ''मला तर तेव्हा पासून लग्न करायचं होतं जेव्हा मी 4 वर्षाची होती. मी प्रत्येक फँसी ड्रेस स्पर्धेमध्ये नवरी बनून जायची. मला  कानातले घालण्याचा,  टिकली लावण्याचा आणि डोक्यावर पदर घेण्याचा खूप छंद होता. प्रत्येक मुलीला लग्न करायची इच्छा असते पण माझ्या इच्छा जरा मोठ्या आहेत. मला माझ्या लायक मुलगाच मिळत नाही. जेव्हा तसा मुलगा मिेळेल तेव्हा मी लग्न करेल.''

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.