'फास्ट अॅंन्ड फ्युरिअस-७' प्रेरणादायी सिनेमा - अमिताभ बच्चन

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी हॉलिवूडच्या 'फास्ट अॅंन्ड फ्युरिअस-७' या सिनेमाची तोंड भरुन स्तुती केली आहे. त्यांनी हा सिनेमा प्रेरणादायी असल्याचं सांगितलंय. हा सिनेमा सर्वांना एकत्र राहण्याचा संदेश देतो. 

Updated: Apr 5, 2015, 03:12 PM IST
'फास्ट अॅंन्ड फ्युरिअस-७' प्रेरणादायी सिनेमा - अमिताभ बच्चन title=

मुंबई : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी हॉलिवूडच्या 'फास्ट अॅंन्ड फ्युरिअस-७' या सिनेमाची तोंड भरुन स्तुती केली आहे. त्यांनी हा सिनेमा प्रेरणादायी असल्याचं सांगितलंय. हा सिनेमा सर्वांना एकत्र राहण्याचा संदेश देतो. 

या सिनेमात पॉल वॉकर सुद्धा काम करतांना दिसत आहे. २०१३ मध्ये एका कार अपघातात पॉलचा मृत्यू झाला होता.   

अमिताभ बच्चन यांनी ट्विट करुन सांगितलं की, 'हा सिनेमा पाहणं खूप प्रेरणादायी होतं.'
गेल्या आठवड्यात हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. सिनेमात विन डॅजल आणि जॅसन स्टॅटहम हे कलाकार देखील आहेत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.