प्रथमच नाटकात वाजणार 'बीऽऽप...बीऽऽप!'

सिनेमात आक्षेपार्ह शब्द किंवा संवादांना बीप लावण्याचा प्रकार आपण पाहिला आहे. मात्र बीपचा हा प्रकार आता नाटकातही दिसणार आहे. नाटकांमध्ये आक्षेपार्ह संवादांना कात्री लावण्यासाठी पहिल्यांदाच हा प्रकार प्रत्यक्षात येणार आहे.

Updated: Nov 30, 2015, 07:10 PM IST
प्रथमच नाटकात वाजणार 'बीऽऽप...बीऽऽप!' title=

मुंबई : सिनेमात आक्षेपार्ह शब्द किंवा संवादांना बीप लावण्याचा प्रकार आपण पाहिला आहे. मात्र बीपचा हा प्रकार आता नाटकातही दिसणार आहे. नाटकांमध्ये आक्षेपार्ह संवादांना कात्री लावण्यासाठी पहिल्यांदाच हा प्रकार प्रत्यक्षात येणार आहे.

'इट्स टू अॅग्रेसिव्ह' हे नाटक त्याच्या पोस्टरमुळे सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. त्यामुळे सेन्सॉर बोर्डाने नाटकात 32 ठिकाणी कात्री लावण्यास सांगितली होती. पण नंतर नाटकात चित्रपटाप्रमाणे बीप लावण्याच्या सर्शतीवर नाटकाला परवानगी देण्यात आली आहे.

नाटक हे एका कॉल गर्लच्या जीवनावर आधारित आहे. त्यामुळे यात अनेक आक्षेपार्ह संवाद आहेत.  पण हा संवाद ही त्या भूमिकेची गरज असून, नाटकातले संवाद हे आक्षेपार्ह असले तरी हे सध्याच्या पिढीचं नाटक असल्याचं कलाकारांचं म्हणणं आहे.

नाटकात प्रथम बीपचा हा प्रयोग प्रेक्षकांना किती आकर्षित करेल हे येणारा काळच ठरवेल.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.