'कॉमेडी नाइट्स लाइव्ह' हा शो 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल' नसण्याची पाच कारणे

मुंबई : कपिल शर्माच्या 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल'ने लोकप्रियतेची शिखरं सर केली होती. 

Updated: Feb 1, 2016, 05:07 PM IST
'कॉमेडी नाइट्स लाइव्ह' हा शो 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल' नसण्याची पाच कारणे title=

मुंबई : कपिल शर्माच्या 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल'ने लोकप्रियतेची शिखरं सर केली होती. आता चॅनल आणि कपिल यांच्यात झालेल्या वादानंतर हा शो बंद करण्यात आला. सिनेविश्वातल्या प्रत्येक कलाकाराला इथे येण्याची इच्छा असे. 
आता या शो ऐवजी 'कॉमेडी नाइट्स लाईव्ह' हा नवा शो आला आहे. पण, कपिलच्या शोसोबत याची तुलना केली जाऊ शकत नाही. याचा पहिला भाग प्रसिद्ध झाल्यावरच सोशल मीडियावर नाराजीचा सूर उमटला. त्याची काही कारणं पुढीलप्रमाणे 

१. कृष्णा विरुद्ध कपिल 
कृष्णा आणि कपिल या दोघांचेही अनेक चाहते आहेत. पण, तरीही दोघेही आपापल्या विशिष्ट शैलीसाठी प्रसिद्ध आहेत. कृष्णाला कपिलशी स्पर्धेत उतरवण्याचा चॅनलचा निर्णय चुकीचा वाटतो. कपिलने लोकांच्या घरात प्रवेश केलाय, कृष्णा हा आपल्या वेळ साधण्याच्या वृत्तीसाठी प्रसिद्ध आहे. या दोघांना एकमेकांशी लढवणे इमानदार चाहत्यांना रुचणारे नाही. भारती सिंगही या नव्या शो मध्ये जुन्या शो वर आसूड उगवण्यातच धन्यता मानत होती, चाहत्यांना कल्पकता हवीये.

२. पंचेसचा अभाव
एकाच भागानंतर निकाल करणे योग्य नसले तरी पहिल्याच भागात कॉमेडी पंचेस कमीच वाटले. कपिलच्या शो वर टीका करण्यातच सर्वांनी धन्यता मांडली. काहीतरी जुनाटच पुन्हा लोकांना देण्यापेक्षा काहीतरी नवीन या लोकांनी देणे अपेक्षित आहे. 

 

३. कपिलची थट्टा 
या भागात कपिलची थट्टा उडवण्याशिवाय फारसे काही घडलेच नाही. यातून हास्य तर काहीच फुलले नाही. आता यातून टीआरपीची शर्यत कशी जिंकणार हा एक प्रश्नच आहे. कारण, टीआरपीसाठी काहीतरी ओरिजिनल असणे गरजेचे आहे. 

४. सिद्धूची कमी 
कपिलच्या शो मध्ये नवजोत सिंग सिद्धूला विशेष स्थान होते. त्याचं शो मधल्या प्रत्येकाशीच चांगलं ट्युनिंग होतं. या शो मध्ये मिका सिंग त्या खुर्चीत आरामात बसलेला दिसला तरी सिद्धूची जादू त्याच्याकडे नाही, हे खरं. मिका काहीतरी मनोरंजन करेल खरं. त्याच्याकडून काहीतरी मसालेदार अपेक्षित आहे. 

५. खराखुरा शो 
कपिल, गुथ्थी, पलक, राजू, दादी, मंजू या सर्वांनाच आम्ही आता खूप मिस करतोय. त्यांची कमी नक्की जाणवते आहे. आता समजत नाहीये की कपिलचा शो बंद करुन कोणाचं खरं नुकसान झालंय.