फ्रिडा पिंटोसाठी आता 'सिद्धार्थ' हाच 'देव'?

'स्लमडॉग मिल्यनेअर' चित्रपटानंतर चर्चेत आलेली, हॉलिवूडमध्ये झळकणारी भारतीय अभिनेत्री फ्रिडा पिंटो आता बॉयफ्रेंड देव पटेल हे एकत्र दिसणार नसल्याचं सांगण्यात येत आहे.

Updated: Dec 11, 2014, 03:01 PM IST
फ्रिडा पिंटोसाठी आता 'सिद्धार्थ' हाच 'देव'? title=

लॉस एंजिलिस : 'स्लमडॉग मिल्यनेअर' चित्रपटानंतर चर्चेत आलेली, हॉलिवूडमध्ये झळकणारी भारतीय अभिनेत्री फ्रिडा पिंटो आता बॉयफ्रेंड देव पटेल हे एकत्र दिसणार नसल्याचं सांगण्यात येत आहे.

फ्रिडाने ऑक्टोबरमध्ये आपला तिसावा वाढदिवस २४ वर्षीय देव पटेल शिवायचं साजरा केला. 'इमॉर्टल्स'ची नायिका फ्रिडा आता उद्योगपती विजय मल्ल्या यांचा मुलगा सिद्धार्थ मल्ल्याची जवळची मैत्रिण झाली असल्याचीही चर्चा आहे. 

फ्रिडाने देवचा हात पकडण्याआधी आधीचा बॉयफ्रेंड रोहन अँटाओ याला जानेवारी २००९ मध्ये  बायबाय केला होता. फ्रिडाचे मित्र तिला सावरत आहेत, असे तिच्या जवळच्या सूत्रांनी सांगितले. दरम्यान, फ्रिडा एकटी आणि आनंदी आहे.  

ऑस्कर पुरस्कार पटकावणाऱ्या 'स्लमडॉग मिल्यनेअर' या चित्रपटात २००८ मध्ये प्रेमकथेतील जोडी पडद्यावर साकारल्यानंतर फ्रिडा आणि देव यांचे सूत जुळले होते. सहा वर्षे हे दोघे एकत्र होते. 'देव आणि फ्रिडा' हे विभक्त झाले आहेत. अनेक दिवसांपासून त्यांचे नाते संपले आहे, असे सूत्रांनी म्हटलंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.