तनिषा-अरमान लवकरच देणार 'गुड न्यूज'

‘बिग बॉस’ सिझन-७ दरम्यान एकमेकांच्या प्रेमात पडलेलं कपल म्हणजेच अरमान कोहली आणि तनिषा मुखर्जी आता आपल्या संबंधांना पुढे नेण्यासाठी तयार आहेत.

Updated: Sep 16, 2014, 08:53 AM IST
तनिषा-अरमान लवकरच देणार 'गुड न्यूज' title=

मुंबई : ‘बिग बॉस’ सिझन-७ दरम्यान एकमेकांच्या प्रेमात पडलेलं कपल म्हणजेच अरमान कोहली आणि तनिषा मुखर्जी आता आपल्या संबंधांना पुढे नेण्यासाठी तयार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अरमान आणि तनिषानं लग्नाचा निर्णय पक्का केलाय. ‘बिग बॉस’ सीझन ७ मध्ये एकमेकांना जवळून ओळखायला लागलेले अरमान-तनिषा पुरते एकमेकांत गुरफटून गेल्याचं प्रेक्षकांनीही पाहिलं होतं.

आता, गायक मिका सिंग यानं ही 'गुड न्यूज' आपल्या ट्विटर अकाऊंटवरून जाहीर केलीय. अरमान आणि तनिषा लवकरच विवाह बंधनात अडकणार असल्याचं मिकानं ट्विटरवर म्हटलंय.

 

अरमानच्या कुटुंबानं तनिषाला सून म्हणून स्वीकारल्याचं कार्यक्रमा दरम्यान अरमाननंच उघड केलं होतं. त्यानंतर तनिषाची आई अभिनेत्री तनुजानंही अरमानला स्वीकारल्याचं दिसलं. 

पण, तनिषा-अरमानच्या या निर्णयाबद्दल तनिषाची मोठी बहिण आणि अभिनेत्री काजोल हिला काय वाटतंय हे अजूनही समजू शकलेलं नाही.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.