बॉलिवूडमध्ये येण्यासाठी गोविंदाच्या मुलीनं बदललं नाव

कॉमेडी आणि डान्सचे सुपरस्टार गोविंदाची मुलगी नर्मदा आहुजाचं अॅक्टिंगचं करिअर अखेर सुरू होतंय. पण एंट्रीमध्ये एक ट्विस्ट आहे. नर्मदा आपल्या खऱ्या नावानं नाही तर टीना आहुजा या नावानं बॉलिवूडमध्ये एंट्री करणार आहे. 

Updated: Oct 8, 2014, 03:28 PM IST
बॉलिवूडमध्ये येण्यासाठी गोविंदाच्या मुलीनं बदललं नाव title=

मुंबई: कॉमेडी आणि डान्सचे सुपरस्टार गोविंदाची मुलगी नर्मदा आहुजाचं अॅक्टिंगचं करिअर अखेर सुरू होतंय. पण एंट्रीमध्ये एक ट्विस्ट आहे. नर्मदा आपल्या खऱ्या नावानं नाही तर टीना आहुजा या नावानं बॉलिवूडमध्ये एंट्री करणार आहे. 

पहिला चित्रपटात तिचा हिरो असेल पंजाबी स्टार आणि गायक गिप्पी ग्रेवाल. हो हा तोच आहे, ज्यानं यो यो हनी सिंहसोबत ‘अंग्रेजी बीट ते’ गाणं गायलं होतं. तर चित्रपट समीप कंग बनवत आहेत. 

तसं तर बॉलिवूडमध्ये नाव बदलून काम करणं काही नवं नाहीय. त्याची एक मोठी रांगच आपल्याला पाहायला मिळेल.

पाहा बॉलिवूडच्या प्रसिद्ध कलाकारांची खरी नावं...

> अशोक कुमार- कुमुद लाल गांगुली
> गुरु दत्त- वसंत कुमार शिवशंकर पादुकोणे
> देव आनंद- धर्म देवदत्त पिशोरीमल आनंद
> जितेंद्र- रवि कपूर
> जॉनी वॉकर- बदरुद्दीन जमालुद्दीन काजी
> दिलीप कुमार- मो. युसूफ खान
> संजीव कुमार- हरिहर जेठालाल जरीवाला
> कमल हसन- अलवरपेट्टाई आंडावार
> रजनीकांत- शिवाजीराव गायकवाड
> चिरंजीवी- कोनीडाला शिवा शंकरा वारा प्रसाद
> राजेश खन्ना- जतिन खन्ना
> डॅनी डेंगजोप्पा- शेरिंग फिंटसो
> जॅकी श्रॉफ- जयकिशन काकूभाई श्रॉफ
> जॉनी लीवर- जॉन प्रकाश राव जानूमाला
> संजय खान- अब्बास खान
> अक्षय कुमार- राजीव हरिओम भाटिया
> अजय देवगन- विशाल देवगन
> जॉन अब्राहम- फरहान अब्राहम
> सनी देओल- अजय सिंह देओल
> बॉबी देओल- विजय सिंह देओल
> चंकी पांडे- सुयश पांडे
> राजकुमार राव- राजकुमार यादव
> मधुबाला- मुमताज जहां बेगम देहलवी
> टुनटुन- उमा देवी
> रेखा- भानुरेखा गणेशन
> तब्बू- तबस्सुम हाशमी खान
> मलिका सेहरावत- रीमा लांबा
> सनी लियोनी- करनजीत कौर वोहरा
> महिमा चौधरी- रितु चौधरी
> जिया खान- नफीसा रिजवी खान
> कटरीना कैफ- कटरीना टरक्युटे
> निशा कोठारी- प्रियंका कोठारी 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.