दुखावलेल्या ऋतिकनं अफवांना फटकारलं...

सुझान रोशननं घटस्फोटासाठी पती ऋतिक रोशनकडे 400 करोड रुपयांची मागणी केल्याच्या बातम्यांना ऋतिकनं अफवा सांगत मीडियाला फटकारलंय.

Updated: Jul 31, 2014, 05:18 PM IST
दुखावलेल्या ऋतिकनं अफवांना फटकारलं... title=
फाईल फोटो

मुंबई : सुझान रोशननं घटस्फोटासाठी पती ऋतिक रोशनकडे 400 करोड रुपयांची मागणी केल्याच्या बातम्यांना ऋतिकनं अफवा सांगत मीडियाला फटकारलंय.

या केवळ अफवा आहेत... आणि ही माझ्या धैर्याची परीक्षा आहे, असं ऋतिकनं सोशल वेबसाईट ट्विटरवर म्हटलंय. 

आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल लोकांनी उडवलेल्या अफवांमुळे दु:खी झालेल्या ऋतिकनं ट्विटरवर लिहिलंय की, ‘या मनानंच बनवलेल्या कहाण्या आहेत... ज्यामुळे माझ्या प्रियजनांना अपमानित व्हावं लागतंय आणि माझ्या धैर्याची परीक्षाही घेतली जातेय’. 

एका इंग्रजी दैनिकानं दिलेल्या बातमीनुसार, सुझाननं ऋतिककडे घटस्फोटाच्या बदल्यात 400 करोड रुपयांची भली मोठी रक्कम मागितली होती. 

ऋतिक आणि सुझाननं डिसेंबर 2013 मध्ये एकमेकांपासून विभक्त होणार असल्याचं जाहीर केलं होतं. सुझाननं आमच्या 17 वर्षांच्या नात्याला पूर्णविराम देण्याचा निर्णय घेतलाय, असं खुद्द ऋतिकनंच सांगितलं होतं. 

या जोडप्यानं अनेक वर्षांच्या मैत्री आणि प्रेमसंबंधांनंतर 20 डिसेंबर 2000 रोजी विवाह बंधनात अडकण्याचा निर्णय घेतला होता. ऋतिक आणि सुझानला रिहाना आणि रिधान अशी दोन मुलंदेखील आहेत.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.