मला बिग बॉस ८ होस्ट करायचंच नव्हतं - सलमान

सलमान खान ‘बिग बॉस’च्या आठव्या पर्वाचं यजमान पद भूषवण्यासाठी सज्ज झालाय. पण, आपल्याला या रिअलिटी टीव्ही शोमध्ये सहभागी व्हायचंच नव्हतं, असं वक्तव्य सलमाननं केलंय. 

Updated: Sep 13, 2014, 08:18 AM IST
मला बिग बॉस ८ होस्ट करायचंच नव्हतं - सलमान title=

मुंबई : सलमान खान ‘बिग बॉस’च्या आठव्या पर्वाचं यजमान पद भूषवण्यासाठी सज्ज झालाय. पण, आपल्याला या रिअलिटी टीव्ही शोमध्ये सहभागी व्हायचंच नव्हतं, असं वक्तव्य सलमाननं केलंय. 

सलमानला या कार्यक्रमाचा होस्ट व्हायचं नव्हतं कारण, २०१३ चं हे पर्व खूपच थकवणारं आहे, असं सलमाननं म्हटलंय. 

४८ वर्षीय सलमान खान गेल्या पर्वात पक्षपातीपणा करण्याच्या आरोपामुळे चर्चेत आला होता. गेल्या पर्वातील इतर सहभागींना सलमानला अभिनेत्री काजोलची बहिण तनीषा मुखर्जी आणि अरमान कोहली यांची बाजू घेण्याचा आरोप केला होता. 

याला, आपण केवळ एक स्टँड घेत आहोत, कुणाचाही पक्ष घेत नाही, असं म्हणत सलमाननं आपला बचाव करण्याचा प्रयत्न केला होता. 

एका मुलाखती दरम्यान बोलताना सलमान म्हणतोय, ‘मला बिग बॉस ८’ करायचंच नव्हतं, कारण हे सगळं खूप थकवणारं आहे. माझ्या वैयक्तिक काही समस्या आहेत आणि इथं मी इतरांच्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यामागे लागलोय. हे लोक मला कोणत्या ना कोणत्या पद्धतीनं सहभागी करून घेतात आणि मीही सामील होऊन जातो. पण, जेव्हा तुम्ही तुमच्या समोर काहीतरी घडताना पाहतात, तेव्हा तुम्हाला एक स्टँड घ्यायलाच लागतो’.

‘मी परत आलो कारण मला केवळ कार्यक्रमाचा फॉर्मेट पसंत पडला. तुम्ही वेगवेगळ्या सहभागींच्या प्रतिक्रिया पाहून खूप काही शिकू शकता. पण, तुम्हालाही माहित असतं की अशा वातावरणात जर तुम्ही असाल तर तुमचीही प्रतिक्रिया अशीच असेल’ असंही सलमाननं म्हटलंय.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.