लैंगिक शोषण झाल्याची मराठी अभिनेत्रीची कबुली

व्यावसायिक आयुष्य आणि शाळेमध्ये असताना माझं लैंगिक शोषण झालं

Updated: May 28, 2016, 09:22 PM IST
लैंगिक शोषण झाल्याची मराठी अभिनेत्रीची कबुली

मुंबई : व्यावसायिक आयुष्य आणि शाळेमध्ये असताना माझं लैंगिक शोषण झालं, अशी धक्कादायक कबुली मराठी अभिनेत्री निकीता गोखलेनं दिली आहे. निकीता गोखलेनं अनेक मॅगझिनच्या फोटोशूटमध्ये न्यूड पोज दिल्या आहेत. 

शाळेमध्ये असताना ट्यूशन टीचरकडून माझं शोषण व्हायचं. नववीमध्ये असताना मी सलवार कमीज घालून क्लासला जायची, तेव्हा ट्यूशन टीचर माझ्या बॉडी पार्ट्सचे फोटो काढायचे आणि मला ब्लॅकमेल करायचे, असा आरोप निकीतानं केला आहे. 

तसंच दिल्लीमध्ये कामासाठी गेले असताना, एका कंपनीच्या मार्केटिंग हेडनं मला केबिनमध्ये बोलावलं आणि माझ्यावर जबरदस्ती केली. याबाबत मी कंपनीच्या वरिष्ठांकडे तक्रार केली, पण त्यांनी या तक्रारीची दखल घेतली नाही, उलट मलाच तिकडून बाहेर काढण्यात आलं, असा दावाही निकीतानं केला आहे.