२२ वर्षांनंतरही दिव्या भारतीच्या मृत्युचं गूढ कायम

शीना बोरा हत्याप्रकरणाच्या तपासात लागलेल्या मुंबई पोलिसांना अजून पूर्णपणे यश मिळालं नाहीय. मुंबईतील या मर्डर मिस्ट्रीनं संपूर्ण देशाला हादरवलंय. पण असाच एक गूढ मृत्यू २२ वर्षांपूर्वी झालाय, ज्याची उकल आजपर्यंत झालेली नाहीय. 

Updated: Sep 9, 2015, 09:39 AM IST
२२ वर्षांनंतरही दिव्या भारतीच्या मृत्युचं गूढ कायम title=

मुंबई: शीना बोरा हत्याप्रकरणाच्या तपासात लागलेल्या मुंबई पोलिसांना अजून पूर्णपणे यश मिळालं नाहीय. मुंबईतील या मर्डर मिस्ट्रीनं संपूर्ण देशाला हादरवलंय. पण असाच एक गूढ मृत्यू २२ वर्षांपूर्वी झालाय, ज्याची उकल आजपर्यंत झालेली नाहीय. 

अवघ्या १९व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणारी दिव्या भारतीच्या मृत्यूनं संपूर्ण देश हादरला होता. तिला प्रेमानं गुडिया म्हणायचे. तिचं सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर तिनं सर्वांचं मन मोहून घेतलं होतं. याचदरम्यान तिचा गूढ मृत्यू झाला.

पाहा दिव्या भारतीशी निगडित काही महत्त्वाच्या गोष्टी -

१. दिव्या भारतीचा जन्म २५ फेब्रुवारी १९७४मध्ये झाला होता.
२. १९९०मध्ये तिनं तेलुगू फिल्म 'बोब्बिली राजा'पासून आपल्या करिअरची सुरूवात केली होती.
३. २० मे १९९२मध्ये तिनं बॉलिवूड फिल्म निर्माता आणि दिग्दर्शक साजिद नाडियाडवाला सोबत लग्न केलं.
४. १९९२मध्ये रिलीज झालेल्या 'दिवाना' चित्रपटातून दिव्या भारतीला सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीचा फिल्मफेअर अॅवॉर्ड मिळाला होता.
५. तिनं जवळपास १४ हिंदी आणि सात दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये कामं केलीत. १९९१ ते १९९३च्या काळात त्यातील अधिकाधिक चित्रपट रिलीज झालेत.
६. ३ एप्रिल १९९३मध्ये फ्लॅटच्या खिडकीतून घसरून पडल्यानं दिव्या भारतीचा गूढ मृत्यू झाला.
७. पोलिसांनी रिपोर्टमध्ये दारूच्या नशेत बालकनीमधून पडल्यानं तिचा मृत्यू झाल्याचं सांगितलं.
८. तर काही जणांनी तिचा मृत्यू म्हणजे हत्या असल्याचं म्हटलं. संशय तिचा पती साजिद नाडियाडवालावर होता.
९. दिव्याच्या मृत्यूच्या वेळी साजिद 'लाडला' चित्रपट सुरू करणार होते. नंतर मग याच श्रीदेवीनं काम केलं.
१०. हत्या की आत्महत्या या पेचात अडकलेला दिव्या भारतीचा मृत्यू आजही मिस्ट्रीच आहे. पोलिसांनी ही फाईल बंद केलीय. 

 

आणखी वाचा - ९ अभिनेत्रींच्या मृत्यूचे रहस्य अजूनही कायम

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.