कंगनाने हृतिकच्या वडिलांना सांगितले, 'आपल्या मुलाला सांभाळा'

अभिनेत्री कंगना आणि अभिनेत्री हृतिक यांच्यात कथित अफेअरदरम्यान, कंगनाने हृतिकला १ हजार ४३९ ई-मेल केले होते, असं हृतिकने कंगनाला पाठवलेल्या अब्रुनुकसानीच्या नोटिसमुळे स्पष्ट होत आहे.

Updated: Mar 17, 2016, 01:01 AM IST
कंगनाने हृतिकच्या वडिलांना सांगितले, 'आपल्या मुलाला सांभाळा'  title=

मुंबई : अभिनेत्री कंगना आणि अभिनेत्री हृतिक यांच्यात कथित अफेअरदरम्यान, कंगनाने हृतिकला १ हजार ४३९ ई-मेल केले होते, असं हृतिकने कंगनाला पाठवलेल्या अब्रुनुकसानीच्या नोटिसमुळे स्पष्ट होत आहे.

हृतिक नोटीसमध्ये म्हणतो, कंगनाने माझ्या वडिलांना राकेश रोशन यांना फोन करुन म्हटले होते, की आपल्या मुलाला सांभाळा. हृतिकने त्याचे वडील दीपेश मेहतांच्या माध्यमातून सोमवारी कंगना ही नोटीस पाठवली होती. कंगनाने एका मुलाखतीत हृतिकचा उल्लेख 'सिली एक्स बॉयफ्रेंड' असा केला होता.

कंगनाची हृतिकला 21 पानांची नोटिस...
कंगनाने नोटिसमध्ये लिहिले आहे, की तिने कधीच कुणाचे नाव घेतले नाही. म्हणून ती कुणाच्या अब्रूनुकसानीसाठी दोषी ठरू शकत नाही.
कंगनाने हृतिकला पाच दिवसांचा वेळ देऊन उत्तर मागितले आहे. मात्र, अद्याप हृतिकने काहीच उत्तर दिलेले नाही.

हृतिकच्या नोटिसमध्ये काय लिहिले
तुम्ही आमच्या क्लायंटच्या गप्प राहण्याचा चुकीचा अर्थ काढला.
त्यांच्या वडिलांना तुम्ही फोन केला आणि सल्ला दिला होता, की आपल्या मुलाला सांभाळा
तुम्ही त्यांना म्हटले की हृतिक मेल्स आणि फोनच्या माध्यमातून वारंवार तुमचा पाठलाग करत आहेत.
राकेश रोशन यांनी तुमची समजूत घालण्याचाही प्रयत्न केला, की त्यांच्या मुलाला तुमच्यात कुठलाही रस नाही.
या नोटिसमध्ये कंगनाने हृतिकला 1439 इमेल्स केल्याचाही उल्लेख करण्यात आला आहे.