'बँक चोर'मधून कपिल शर्मा आऊट

कॉमेडीचा किंग असलेला कपिल शर्माच्या चाहत्यांना एक वाईट बातमी आहेत. कपिलचे चाहते जे त्याचा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक होते त्यांच्या आनंदावर विरजण पडलेय.

Updated: Jul 4, 2014, 08:20 PM IST
'बँक चोर'मधून कपिल शर्मा आऊट title=
फाईल फोटो

मुंबई : कॉमेडीचा किंग असलेला कपिल शर्माच्या चाहत्यांना एक वाईट बातमी आहेत. कपिलचे चाहते जे त्याचा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक होते त्यांच्या आनंदावर विरजण पडलेय.

यशराज बॅनर खाली 'बँक चोर'मधून डेब्यू करणारा कपिल त्या सिनेमातून आऊट झालाय. या चित्रपटातून कपिल पहिल्यांदा बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार होता. 

वाई फ्लिम्सचा क्रियेटिव्ह हेड आशिष पाटीलने सांगितले की, 'यशराज फिल्म्स आणि कपिल शर्मा आता एकत्र काम करत नाहीत. तेव्हा त्यांने सांगितलं की, जेव्हा चांगली वेळ येईल तेव्हा भविष्यात आम्ही एकत्र काम करू.' असं एकण्यात येतेय की, कपिलच्या हातातून फक्त बँक चोर नाहीतर यशराज फिल्म्ससोबत डिल केलेल्या तीन फिल्मही गेल्या आहेत. 

या सिनेमात काम करण्यासाठी कपिल त्याची पॉप्युलर सिरीअल 'कॉमेडी नाइटस विथ कपिल'लाही ब्रेक घेतला होता. 

बँक चोर ही कॉमिक बँकग्राऊंड असलेली फिल्म असेल. त्यात तीन मुलं बँक लुटण्याच्या हेतूने जातात पण त्यावेळी ते पोलिसांच्या तावडीत सापडतात. मात्र त्या घटनेनंतर त्यांच्यासोबत सर्वच वाईट होण्यास सुरुवात होते. मग त्या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी ते ज्या ज्या गोष्टी करतात ते पाहण्यास खूप फनी असणार आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.