मुंबई : सोनी टीव्हीवर सुरू झालेल्या कॉमेडियन कपिलचा शो ' द कपिल शर्मा शो' ला कृष्णाचा 'कॉमेडी नाइट्स' खूप टक्कर देत आहे.
टेलिव्हीजन रेटिंगनुसार कृष्णाच्या शोने कपिलच्या शोला मागे टाकले आहे. कपिलच्या शोला जेवढे प्रेक्षक मिळायला पाहिजे होते. तेवढी प्रेक्षक मिळाले नाही. लोकांनी कृष्णाच्या शोला पसंती दिली आहे.
रेटिंग काय सांगते...
ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काउंसिल (BARK)नुसार 'द कपिल' शोला पहिल्या आठवड्यात ९० लाख जणांनी पाहिले.
तर दुसऱ्या आठवड्यात ही संख्या ५५ लाखांवर खाली. टीआरपीच्या खेळात कलर्सवर प्रसारित होणारा 'इंडिया गॉट टॅलेंट' टॉप राहिला आहे.
इंडिया गॉट टॅलेंटने ८५ लाख लोकांनी पाहिले, तर कपिलच्या शोला ५५ लाख जणांनी पाहिले. तर कृष्णाच्या कॉमेडी नाइट्स बचाओने ६० लाख आणि कॉमेडी नाइट्सने ५६ लाख प्रेक्षक संख्या मिळवली आहे. ही कपिलच्या शोच्या पुढे आहे.
नॉन फिक्शनमध्ये कपिल चौथ्या क्रमांकावर आहे. यानंतर पाचव्या स्थानावर सारेगमापा आहे.