करिनाने लग्नानंतर केलेलं कमिटमेंट मो़डलं

बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूरने सैफ अली खान याच्यासोबत लग्न झाल्यानंतर कमिटमेंट केलं होतं की ती यापुढे किंसिंग सीन करणार नाही. पण तिचं हे कमिटमेंट आता तुटलं आहे.

Updated: Feb 14, 2016, 03:26 PM IST
करिनाने लग्नानंतर केलेलं कमिटमेंट मो़डलं title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूरने सैफ अली खान याच्यासोबत लग्न झाल्यानंतर कमिटमेंट केलं होतं की ती यापुढे किंसिंग सीन करणार नाही. पण तिचं हे कमिटमेंट आता तुटलं आहे.

करिना कपूर हिच्या आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये ती अर्जून कपूरला किस करतांना दिसत आहे. या पोस्टरमध्ये दोघेही एका नव्या केमेस्ट्रीमध्ये दिसत आहे.

करिना कपूरने याआधी ३ इडियट्स या सिनेमामध्ये आमिर खानसोबत किसिंग सीन केला होता. हा सिनेमा १ एप्रिलला रिलीज होणार आहे. या सिनेमामध्ये अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांची देखील पाहुण्याची भूमिका आहे.