संजय-करिश्माचं नातं मारहाणीपर्यंत येऊन पोहचलं होतं?

अभिनेत्री करिश्मा कपूर आणि संजय कपूर यांचं विवाहाचं गोड नातं आता संपुष्टात आल्याचं चित्र आहे... केवळ कायदेशीररित्या दोघे विभक्त होणं बाकी असलं तरी या दोघांची मनं मात्र एकमेकांबाबतीत इतकी कलुषित झालीत की त्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीच झाडल्यात.

Updated: Mar 1, 2016, 05:55 PM IST
संजय-करिश्माचं नातं मारहाणीपर्यंत येऊन पोहचलं होतं? title=

मुंबई : अभिनेत्री करिश्मा कपूर आणि संजय कपूर यांचं विवाहाचं गोड नातं आता संपुष्टात आल्याचं चित्र आहे... केवळ कायदेशीररित्या दोघे विभक्त होणं बाकी असलं तरी या दोघांची मनं मात्र एकमेकांबाबतीत इतकी कलुषित झालीत की त्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीच झाडल्यात.

एकमेकांवरच्या या आरोपांमुळेच संजय - करिश्माच्या संसारातील काही घरच्या गोष्टी चव्हाट्यावर आल्यात. हे दावे तितकेच धक्कादायकही आहेत. 

हुंड्यासाठी छळ केल्याचं सांगत करिश्मानं दाखल केलेल्या नव्या आरोपांमुळे या प्रकरणानं आता वेगळंच वळण घेतलंय. 

मी गर्भवती असताना ड्रेस फिट होत नाही म्हणून संजयनं त्याच्या आईला आपल्या कानाखाली मारण्यास फर्मावलं होतं, असा धक्कादायक दावा करिश्मानं केलाय. 'तू तिला कानाखाली का मारत नाहीस?' असं संजयनं त्याच्या आईला म्हटल्याचा करिश्मानं आपल्या तक्रारीत उल्लेख केलाय.