मुंबई : अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री कतरिना कैफ ही ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन भलतीच फॉर्मात असलेली जोडी... पण, आता ही जोडी विभक्त होणार की काय? असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना हादरवून सोडतोय.
होय, कारण रणबीर - कतरिनाचं नातं सध्या थोडं हेलकावे खातंय असं आता समोर येतंय. एका एन्टरटेन्मेंट वेबसाईटनं दिलेल्या माहितीनुसार, रणबीरची दीपिकाशी जवळीक वाढल्यानंतर कतरिना भलतीच नाराज आहे. ती आपल्या नात्याबद्दल पुन्हा विचार करतेय.
रणबीर सध्या त्याची एक्स गर्लफ्रेंड दीपिका पादूकोणसोबत 'तमाशा' या सिनेमात काम करतोय. प्रमोशन दरम्यान हे दोघे जण पुन्हा एकदा जवळ आल्याची चर्चा आहे. यामुळेच रणबीर आणि कतरिनाचं एकमेकांशी पटेनासं झालंय, असं 9XE.COM नं म्हटलंय.
या आधीही एका एका जाहीर मुलाखती दरम्यान कतरिनानं रणबीर-दीपिकाच्या एकत्र काम करण्याबद्दल नाराजी (उघडपणे नसली तरी) व्यक्त केली होती.
आपल्या आई-वडिलांपासून विभक्त होत रणबीरनं कतरिनासोबत एकाच छताखाली राहत आहे. हे दोघे सध्या 'लिव्ह इन रिलेशनशीप'मध्ये राहत असल्याची चर्चा आहे.