काशीबाईंच्या 'पिंगा'वरून सोशल मीडियावर वादाचा पिंगा

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित बाजीराव मस्तानी या सिनेमातीलं पिंगा हे गाणं सध्या चांगलचं गाजतंय .. या गाण्यात दीपिका पदुकोण आणि प्रियंका चोप्रा या बॉलिवूडच्या टॉपच्या हिरोईन्सची जुगलबंदी पहायला मिळतेय.मात्र हे गाणं वादात सापडण्याची शक्यता निर्माण झालीय.

Updated: Nov 20, 2015, 07:46 PM IST
काशीबाईंच्या 'पिंगा'वरून सोशल मीडियावर वादाचा पिंगा title=

मुंबई : संजय लीला भन्साळी दिग्दर्शित बाजीराव मस्तानी या सिनेमातीलं पिंगा हे गाणं सध्या चांगलचं गाजतंय .. या गाण्यात दीपिका पदुकोण आणि प्रियंका चोप्रा या बॉलिवूडच्या टॉपच्या हिरोईन्सची जुगलबंदी पहायला मिळतेय.मात्र हे गाणं वादात सापडण्याची शक्यता निर्माण झालीय.

बाजीराव मस्तानी हा इतिहासावर आधारीत सिनेमा असून इतिहासात डोकावून पहिल्यास काशीबाई आणि मस्तानी या दोघी कधीच एकमेकींसमोर आल्या नाहीत. तसेच काशीबाई एका पायाने अधु होत्या असं असतांनाही या सिनेमाचा निर्माता संजय लिला भन्साळी यांनी क्रिएटिव्हीच्या नावाखाली जरा जास्तचं लिबर्टी घेतलीय. त्यामुळे बाजीराव मस्तानीतून वेगळाच इतिहास प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

बाजीराव मस्तानीतील हा पिंगा टिपीकल  भन्साळी स्टाईलचा  पिंगा असून त्यावर देवदासची छाप पहायला मिळते. त्यामुळेच सोशल मीडियावर प्रेक्षकांनी भन्साळींच्या या पिंगा गाण्यावर टीकेचे झोड उठवलीय.. मराठी सेलिब्रेटींनी मात्र सिनेमॅटिक लिबर्टी मान्य केली पाहिजे, असं म्हटलंय.

पाहा व्हिडिओ

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.