प्रिती झिंटा भडकली, किती वेळा सांगू तसं काहीही नाही!

पंजाब कुडी आणि बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटा आणि अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग यांच्यात रिलेशनशिप असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले. त्यानंतर प्रितीने अस आमच्यात काहीही नाही. आम्ही डेटवर गेलेलो नाही, असं सांगत मीडियावर भडकली.

Updated: Feb 20, 2015, 08:57 AM IST
प्रिती झिंटा भडकली, किती वेळा सांगू तसं काहीही नाही! title=

मुंबई : पंजाब कुडी आणि बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटा आणि अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग यांच्यात रिलेशनशिप असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले. त्यानंतर प्रितीने अस आमच्यात काहीही नाही. आम्ही डेटवर गेलेलो नाही, असं सांगत मीडियावर भडकली.

युवराजसोबत कधीही डेट केले नाही, असा खुलासा प्रितीने ट्विटरद्वारे केला आहे.  एका इंग्रजी वृत्तपत्राने युवराज सिंगबाबत एक अहवाल प्रसिद्ध केला होता. यामध्ये युवराज सिंगचे बॉलिवूडमधील नऊ अभिनेत्रींसोबत संबंध होते, असं म्हटलं होतं. यात प्रितीचा समावेश असल्याचे म्हटले.

याबाबत प्रितीने केलेला ट्विट  

 
डियर मीडिया, मी युवराजसोबत कधीही डेट केले नाही, तसेच कधी डेटिंग करण्याचा विचार नाही, हे मी किती वेळा तुम्हाला सांगू. आम्ही आमच्या कामामुळे एकत्र असतो. त्याचा अर्थ आम्ही रिलेशनशिपमध्ये आहे, असा होत नाही.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.