लॉस्ट अॅन्ड फाऊंड : हरवलेली वाट नव्यानं शोधण्याचा प्रयत्न

या विकेन्डला ऋतुराज दिग्दर्शित डॉ. मोहन आगाशे, मंगेश देसाई, स्पृहा जोशी, सिद्धार्थ चांदेकर याच्या प्रमुख भूमिका असलेला 'लॉस्ट अॅन्ड फाऊंड' हा सिनेमाही प्रदर्शित झालाय. 

Updated: Jul 29, 2016, 04:43 PM IST
लॉस्ट अॅन्ड फाऊंड : हरवलेली वाट नव्यानं शोधण्याचा प्रयत्न title=

मुंबई : या विकेन्डला ऋतुराज दिग्दर्शित डॉ. मोहन आगाशे, मंगेश देसाई, स्पृहा जोशी, सिद्धार्थ चांदेकर याच्या प्रमुख भूमिका असलेला 'लॉस्ट अॅन्ड फाऊंड' हा सिनेमाही प्रदर्शित झालाय. 

सिनेमाचं कथानक 

हरवलेली वाट नव्यानं शोधण्याचा प्रयत्न 'लॉस्ट अॅन्ड फाऊंड' या सिनेमात करण्यात आलाय. मानस, नैना, मारुती, श्रीरंग काका या सगळ्यांच कॅरेक्टर्सच्या आयुष्यात काही ना काही समस्या आहेत... आपल्याशी बोलायलासुद्धा कुणी नाही, या एकटेपणानं हे सगळेच पीडित आहेत. 

तेव्हा या एकटेपणावर मात करायचा... पण केवळ आपल्यासाठी नाही तरी इतरांसाठीही... याच उद्देशातून हे सगळे एकत्र येतात आणि 'अॅन्टी लोन्लिनेस प्रोगाम'ची स्थापना करतात. या कॅम्पेन अंतर्गत ज्यांना आपली सुख दु:ख शेयर करायला कुणीच नाही अशा लोकांसोबत एक दिवस घालवायचा आणि त्यांना बोलतं करायचं... याच दरम्यान अनेक नवीन नाती जोडली जातात.

राजू हिराणी टच 

'लॉस्ट अॅन्ड फाऊंड' या सिनेमाला थोडासा राजू हिराणी टच आहे. मुन्नाभाई आणि थ्री इडियट्स यांसारख्या सिनेमांचा फ्लेवर या सिनेमात दिसून येतो. इन शॉर्ट या सिनेमांमधून प्रेरणा घेतलेला असा 'लॉस्ट अॅन्ड फाऊंड' हा सिनेमा आहे, ज्यात थोडासा लव्ह अँगलही पहायला मिळतो.

अभिनय आणि मेहनत

अभिनेता मोहन आगाशे, मंगेश देसाई या दोघांनीही आपआपल्या व्यक्तिरेखा चोख पार पाडल्या आहेत. अभिनेत्री स्पृहा जोशी या सिनेमात जिकती सुंदर दिसतेय तितकाच सुंदर अभिनयही तिनं केलाय. सिद्धार्थ चांदेकरनं आपली भूमिका योग्य रित्या बजवली आहे. अगोदर उल्लेखकेल्याप्रमाणे राजू हिराणी स्टाईलचा सिनेमा दिग्दर्शक ऋतुराज धालगडेनं बनवण्याचा प्रयत्न केलाय आणि या प्रयत्नात तो बऱ्यापैंकी यशस्वीही झालाय. 

...पण तरीही

सिनेमाची कथा चांगली आहे पण काही ठिकाणी काही सीन्स अपूर्ण वाटतात, ज्याचा अर्थ लावता येत नाही... उदाणार्थ जेव्हा श्रीरंग काका आणि मंगेश एका बंगाली बाईची भेट घेतात... जेव्हा क्लायमॅक्सला मानस आपल्या एक्स गर्लफ्रेन्डला भेटतो आणि अचानक नैनाच्या प्रेमाची किंमत त्याला कळते... काही चुका वगळता सिनेमा छान झालाय.

तेव्हा 'लॉस्ट अॅन्ड फाऊंड' या सिनेमातील हे सगळे एलिमेन्ट्स पाहता आम्ही या सिनेमाला देतोय ३ स्टार्स...