close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

लुलिया म्हणते, इतक्यात लग्न नको

बॅालिवूडचा दबंग सलमान खान व लुलिया लग्न करणार असल्याची बातम्या सध्या चर्चेत आहे. यावर सलमानची गर्लफ्रेंड लुलियाने पहिल्यांदाच विधान केलेय.

Updated: May 22, 2016, 04:19 PM IST
लुलिया म्हणते, इतक्यात लग्न नको

मुंबई : बॅालिवूडचा दबंग सलमान खान व लुलिया लग्न करणार असल्याची बातम्या सध्या चर्चेत आहे. यावर सलमानची गर्लफ्रेंड लुलियाने पहिल्यांदाच विधान केलेय.

"डियर फ्रेंड्स, मला कोणत्याही अफवांवर प्रतिक्रिया देणे महत्त्वाचे वाटले नाही
 पण, आता मला असे सांगावसे वाटते की मी कधी लग्नाविषयी काही बोलले नाही आणि इतक्यात मला लग्नाचा शालू नेसायचाही नाही" असे लुलियाने इंन्स्टाग्रामवर पोस्ट केले.

आश्चर्याची गोष्ट अशी की बऱ्याच दिवसांपासून लुलिया आणि सलमानच्या लग्नाच्या अफवा येत होत्या. लुलियाबी सलमानच्या कुटुंबासोबतदेखील मुंबई एयरपोर्टवर दिसली होती.

इतकेच नव्हे तर सलमान आणि लुलिया प्रिती झिंटाच्या रिसेप्शनमध्ये देखील एकत्र होते. त्यानंतर त्यांच्या लग्नाच्या चर्चांना अधिकच उधाण आले होते. मात्र आता खुद्द लुलियानेच इतक्यात लग्न कऱणार नसल्याचे स्पष्ट केलेय.