अभिनेते अतुल अभ्यंकर काळाच्या पडद्याआड

'जय मल्हार' या लोकप्रिय मराठी मालिकेमध्ये 'हेगडी प्रधाना'ची भूमिका साकारणारे अभिनेते अतुल अभ्यंकर यांचं आज सकाळी निधन झालंय. 

Updated: Nov 12, 2014, 02:17 PM IST
अभिनेते अतुल अभ्यंकर काळाच्या पडद्याआड title=
सौ. झी मराठी

मुंबई : 'जय मल्हार' या लोकप्रिय मराठी मालिकेमध्ये 'हेगडी प्रधाना'ची भूमिका साकारणारे अभिनेते अतुल अभ्यंकर यांचं आज सकाळी निधन झालंय. 

अभ्यंकर यांच्या पार्थिवावर आज दुपारी तीन वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दादर येथील शिवाजी पार्क स्मशानभूमीमध्ये अंत्यविधीचे सोपस्कार पार पडतील. 


Caption

अभिनेता अतुल अभ्यंकर यांना बसलेल्या हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचं निधन झालंय. अभ्यंकर यांची 'जय मल्हार' या कार्यक्रमातील अतिशय संयमी प्रधानाची भूमिका चांगलीच गाजली होती. 

ते ४२ वर्षांचे होते... त्यांच्या मागे पत्नी आणि आई असा परिवार आहे... झी मराठी या वाहिनीवरील 'जय मल्हार' या मालिकेतील 'हेगडी प्रधान' या भूमिकेसाठी नुकताच त्यांना 'झी मराठी अॅवॉर्डस् २०१४'चा सर्वोत्कृष्ठ पुरुष व्यक्तिरेखेचा पुरस्कार मिळाला होता. 

अतुल अभ्यंकर यांनी सारे प्रवासी घडीचे, केशवा माधवा या नाटकातही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. त्यांच्या जाण्यानं मराठी रंभगूमीला मोठा धक्का बसलाय.   

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.