'कट्यार काळजात घुसली'ची ४६व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी निवड

'कट्यार काळजात घुसली' हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच नवा रेकॉर्ड कायम करण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर अतिशय महत्त्वाचा असलेल्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हल ऑफ इंडिया (इफ्फी) २०१५ च्या इंडियन पॅनोरमा विभागासाठी या चित्रपटाची निवड करण्यात आली आहे. 

Updated: Nov 3, 2015, 01:34 PM IST
'कट्यार काळजात घुसली'ची ४६व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी निवड title=

मुंबई: 'कट्यार काळजात घुसली' हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच नवा रेकॉर्ड कायम करण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर अतिशय महत्त्वाचा असलेल्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हल ऑफ इंडिया (इफ्फी) २०१५ च्या इंडियन पॅनोरमा विभागासाठी या चित्रपटाची निवड करण्यात आली आहे. 

मराठी संगीतरंगभूमीवरचं मानाचं पान असलेलं अजरामर नाटक म्हणजे संगीत कट्यार काळजात घुसली. आपल्या श्रवणीय संगीताच्या जोरावर आजवर अनेक रसिक प्रेक्षकांची मनं जिंकणारं हे नाटक आता चित्रपटाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर येत आहे. येत्या दिवाळीत १२ नोव्हेंबरला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. 

आणखी वाचा - शंकर महादेवनचं 'सूर निरागस हो' हिट, अवघं बॉलिवूड पडलं प्रेमात

इफ्फीमध्ये आंतरराष्ट्रीय चित्रपटांबरोबरच विविध प्रकारच्या चित्रपटांसाठी काही विशेष विभाग तयार केलेले असतात. येत्या २१ नोव्हेंबरपासून गोव्यात देश विदेशातील अनेक चित्रपटांचा हा महाकुंभ भरणार आहे. 'झी स्टुडिओ'निर्मित आणि सुबोध भावे दिग्दर्शित 'कट्यार काळजात घुसली' या चित्रपटाची निवड झाल्यानं आनंद व्यक्त करण्यात येतोय.  

 

गेल्या वर्षी इंडियन पॅनोरमा विभागात तब्बल ११ चित्रपटांसह मराठीनं बाजी मारली होती. ज्यामध्ये एस्सेल व्हिजनच्या (आताचे झी स्टुडिओज्) 'किल्ला', 'एलिझाबेथ एकादशी', 'लोकमान्य-एक युगपुरूष' आणि 'डॉ. प्रकाश बाबा आमटे – द रिअल हिरो' या तब्बल चार चित्रपटांची निवड झाली होती. तर २०१३मध्ये हा मान एस्सेल व्हिजनच्या 'फॅंड्री'ला मिळाला होता.  

आणखी वाचा - 'कट्यार काळजात घुसली'चा ट्रेलर लॉन्च, काळजाला भिडणारा चित्रपट

'हा केवळ माझा किंवा या चित्रपटाचा सन्मान नसून तो ख-या अर्थाने कट्यारचे जनक पुरूषोत्तम दारव्हेकर, संगीतकार पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा सन्मान आहे. मराठी संगीत नाटकाची एवढ्या मोठ्या स्तरावर दखल घेतली गेली ही गौरवाची बाब आहे. इफ्फीच्या माध्यमातून जगभरातील रसिकांसमोर भारतीय शास्त्रीय संगीताची जादू पसरेल याचा आनंद आहे', अशी प्रतिक्रिया चित्रपटाचा दिग्दर्शक सुबोध भावेनं दिलीय.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.