व्हिडिओ : रणबीर कपूर की रणवीर सिंग? पाहा, दीपिका काय म्हणतेय...

निर्माता - दिग्दर्शक करण जोहरचा 'कॉफी विथ करण' हा शो बी टाऊनमध्ये भलताच प्रसिद्ध आहे... या कार्यक्रमात करणचे बेधडक प्रश्न आणि स्टार्सनं त्याला आपापल्या परीनं दिलेल्या उत्तरांमुळे बॉलिवूडमध्ये हा शो बराच चर्चेत असतो. 

Updated: Nov 3, 2015, 10:00 AM IST
व्हिडिओ : रणबीर कपूर की रणवीर सिंग? पाहा, दीपिका काय म्हणतेय... title=

मुंबई : निर्माता - दिग्दर्शक करण जोहरचा 'कॉफी विथ करण' हा शो बी टाऊनमध्ये भलताच प्रसिद्ध आहे... या कार्यक्रमात करणचे बेधडक प्रश्न आणि स्टार्सनं त्याला आपापल्या परीनं दिलेल्या उत्तरांमुळे बॉलिवूडमध्ये हा शो बराच चर्चेत असतो. 

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादूकोणलाही या कार्यक्रमात पुन्हा एकदा सहभागी होण्याची इच्छा आहे... आणि तेही रणबीर कपूर सोबत... नुकत्याच झालेल्या एका प्रेस कॉन्फरन्समध्ये करणशी व्हिडिओ चॅटमधून संवाद साधताना दीपिकानं ही इच्छा व्यक्त केली. 

यावेळी, गुगली टाकत करणनंही मौका साधला... आणि दीपिकालाही प्रेक्षकांच्या मनातला एक प्रश्न विचारून टाकला... करणनं दीपिकाला 'रणबीर कपूर की रणवीर सिंग' हा प्रश्न विचारला... आणि त्यावर दीपिकानं काय उत्तर दिलं... ते तुम्हीच पाहा... 

 

 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.