अखेर, अदनान सामी झाला 'भारतीय'!

पाकिस्तानचा प्रसिद्ध गायक अदनान सामी याला अखेर भारताचं नागरिकत्व मिळालंय. १ जानेवारी २०१६ पासून अदनान 'भारतीय' होणार आहे.

Updated: Dec 31, 2015, 04:21 PM IST
अखेर, अदनान सामी झाला 'भारतीय'! title=

नवी दिल्ली : पाकिस्तानचा प्रसिद्ध गायक अदनान सामी याला भारत सरकारनं नवीन वर्षांचं एक मोठ्ठं गिफ्ट दिलंय. अदनानला अखेर भारताचं नागरिकत्व मिळालंय. १ जानेवारी २०१६ पासून अदनान 'भारतीय' होणार आहे.

भारताचं नागरिकत्व मिळण्यासाठी अदनान सामी गेल्या अनेक दिवसांपासून धडपड करत होता. अदनानच्या या अर्जाला गृह मंत्रालयानं हिरवा कंदील दाखवलाय. 

त्यामुळे, येत्या वर्षाचं स्वागत अदनान एक 'भारतीय' म्हणून करणार आहे. 

लाहोरला जन्मलेला अदनानचा १३ मार्च २००१ रोजी पहिल्यांदा भारतात आला होता.