पॉर्न स्टार मिया खलीफाला 'बिग बॉस -९'मध्ये एंट्री?

बिग बॉसच्या नवव्या सिझनमध्ये आणखी एका पॉर्न स्टारला एंट्री मिळू शकते. मीडिया रिपोर्टनुसार पॉर्न स्टार मिया खलीफा यावेळी बिग बॉसच्या घरात दिसू शकले. मिळालेल्या बातमीनुसार चॅनेलने तिला अॅप्रोच केलंय. मिया खलीफा सुद्धा बिग बॉसमध्ये येण्यास उत्सुक असल्याचं कळतंय.

Updated: Sep 14, 2015, 06:14 PM IST
पॉर्न स्टार मिया खलीफाला 'बिग बॉस -९'मध्ये एंट्री? title=
सौजन्य : मिया खलीफा ट्विटर हँडल

नवी दिल्ली: बिग बॉसच्या नवव्या सिझनमध्ये आणखी एका पॉर्न स्टारला एंट्री मिळू शकते. मीडिया रिपोर्टनुसार पॉर्न स्टार मिया खलीफा यावेळी बिग बॉसच्या घरात दिसू शकले. मिळालेल्या बातमीनुसार चॅनेलने तिला अॅप्रोच केलंय. मिया खलीफा सुद्धा बिग बॉसमध्ये येण्यास उत्सुक असल्याचं कळतंय.

आणखी वाचा - व्हिडिओ : 'बिग बॉस9'च्या दुसऱ्या प्रोमोत सलमानचा 'डबल ट्रबल'!

मिया खलीफा जर 'बिग बॉस'च्या घरात येत असेल तर अशी करणारी ती पहिली पॉर्न स्टार नसेल. यापूर्वी बिग बॉसच्या पाचव्या सिझनमध्ये कॅनेडियन पॉर्न स्टार सनी लिऑन बिग बॉसच्या घरात आली होती. सनी लिऑनसाठी बिग बॉस खूप लकी ठरलं आणि या शोमुळेच तिला बॉलिवूडमध्ये एंट्री मिळाली.

रिपोर्टनुसार लेबनानमध्ये जन्मलेली मिया आता २२ वर्षांची आहे आणि सध्या ती मियामी इथं राहते. जर ती सुरूवातीपासून या शोमध्ये नसेल तर तिची वाइल्ड कार्ड एंट्री होऊ शकते. 'बिग बॉस'च्या वेळीस प्रेक्षकांनी सनी लिऑनला पसंत केलं होतं आणि चॅनेलला अपेक्षा आहे की, मिया खलीफालाही प्रेक्षक पसंत करतील. दरम्यान बिग बॉसकडून अद्याप याबाबत काही सांगण्यात आलेलं नाही. यंदाही ,सलमान खान शोचं होस्टिंग करणार आहे.

आणखी वाचा - बिग बॉस ९ : सेक्स रॅकेटमुळे चर्चेत आलेल्या अभिनेत्रीचा समावेश?

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.