सलमानच्या बहिणीच्या लग्नासाठी हजेरी लावणार पंतप्रधान मोदी!

बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या बहिणीचं अर्थात अर्पिताचं लवकरच होणारं लग्न खुपच खास ठरणार आहे... कारण, या लग्नाला खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी हजेरी लावण्याची शक्यता आहे.

Updated: Oct 22, 2014, 02:30 PM IST
सलमानच्या बहिणीच्या लग्नासाठी हजेरी लावणार पंतप्रधान मोदी!  title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या बहिणीचं अर्थात अर्पिताचं लवकरच होणारं लग्न खुपच खास ठरणार आहे... कारण, या लग्नाला खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी हजेरी लावण्याची शक्यता आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमान आणि त्याचे वडील सलीम खान यांनी मोदींना निमंत्रण देणार आहेत. उल्लेखनीय म्हणजे, नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाची शपथ ग्रहण सोहळ्यासाठी सलमान आणि त्याचे वडील सलीम खान यांनाही आमंत्रित करण्यात आलं होतं.   

अर्पिताचं येत्या 16 नोव्हेंबर रोजी लग्न आयोजित करण्यात आलंय. त्याचनिमित्तानं, या बातमीला दुजोरा देत, आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रित करणार आहोत आणि आशा आहे की त्यांना या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी वेळ मिळेल, असं सलीम खान यांनी म्हटलंय. 

सोबतच, माझा जास्त खर्चिक आणि डामडौल असणाऱ्या लग्न सोहळ्यांवर विश्वास नाही, असंही सलीम खान यांनी म्हटलंय. 

अर्पित आपल्या तीनही भावांपैकी सलमानच्या अधिक जवळ आहे. अर्पिता गेल्या अनेक दिवसांपासून बिझनेसमन आयुष शर्मा याच्यासोबत प्रेमाच्या धाग्यात गुंफलेली आहे. हे लग्न हैदराबादच्या एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आलंय.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.