'हे राम नथुराम' नाटकाला राणेंचा विरोध, अभिनेत्याला धमकी

अभिनेते शरद पोंक्षे यांच्या 'हे राम नथुराम' या नाटकाला कोल्हापुरनंतर आता कोकणातही विरोध होऊ लागला आहे.

Updated: Jan 12, 2017, 08:28 AM IST
'हे राम नथुराम' नाटकाला राणेंचा विरोध, अभिनेत्याला धमकी

मुंबई : अभिनेते शरद पोंक्षे यांच्या 'हे राम नथुराम' या नाटकाला कोल्हापुरनंतर आता कोकणातही विरोध होऊ लागला आहे.

'हे राम नथुराम' या नाटकाचे कोकणात प्रयोग कराल तर विचार करुन करा, अशी धमकी स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष नितेश राणेंनी दिल्याचा आरोप शरद पोंक्षे यांनी केलाय.

 

शरद पोंक्षे सध्या या नाटकाच्या निमित्ताने कोकणच्या दौऱ्यावर आहेत. मात्र या नाटकाची तिकीट विक्री कुडाळ, मालवण आणि कणकवली या ठिकाणी थांबविण्यात आलीय.

या धमकीनंतर शरद पोंक्षे यांनी पोलिसांत तक्रार केली असून पोलीस संरक्षणात नाटकाचे प्रयोग करण्याचा निर्धार त्यांनी केलाय.