नवी दिल्ली : कॉमेडीकिंग म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केल्यानंतर कपिल शर्मा लवकरच 'किस किस को प्यार करू' या सिनेमातून एका अभिनेत्याच्या रुपात मोठ्या पडद्यावर दाखल होतोय... पण, बॉलिवूडमध्ये शिरल्यानंतरही आपण कॉमेडी शोमध्ये काम करतच राहणार असल्याचं कपिलनं म्हटलंय.
दुखापतीमुळे सध्या कपिल 'कॉमेडी नाईटस विथ कपिल' या तुफान लोकप्रिय कार्यक्रमातून बाहेर आहे. त्याच्याऐवजी हा शोसध्या साजिद खान आणि अर्शद वारसी हे होस्ट करत आहेत. याबद्दल कपिलनं त्यांचे आभार मानलेत.
लवकर फिट अॅन्ड फाईन होऊन या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांसमोर येण्यासाठी आपण चांगलाच प्रयत्न करत असल्याचं कपिल सांगतोय.
सिनेनिर्माते अब्बास-मस्तान यांच्या 'किस किस को प्यार करू' या सिनेमात कपिलसोबत अरबाझ खान, एली अवराम, वरुण शर्मा आणि मंजिरी फडनिस हेदेखील दिसणार आहेत. हा सिनेमा २५ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.