तारक मेहतामधील बबीता-अय्यर होणार वेगळे

२०१६ हे वर्ष चित्रपट आणि छोट्य़ा पडद्यावरील जोड्यांसाठी काही खास नाहीये. आतापर्यंत कटरिना-रणबीर, अनुष्का-विराट, रश्मी देसाई-नंदीश संधू या जोड्या वेगळ्या झाल्यानंतर आता या प्रसिद्ध जोडीचाही समावेश झालाय.

Updated: Apr 6, 2016, 02:09 PM IST
तारक मेहतामधील बबीता-अय्यर होणार वेगळे

मुंबई : २०१६ हे वर्ष चित्रपट आणि छोट्य़ा पडद्यावरील जोड्यांसाठी काही खास नाहीये. आतापर्यंत कटरिना-रणबीर, अनुष्का-विराट, रश्मी देसाई-नंदीश संधू या जोड्या वेगळ्या झाल्यानंतर आता या प्रसिद्ध जोडीचाही समावेश झालाय.

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील समजदार जोडी बबिता आणि अय्यर यांच्या नात्यात दुरावा निर्माण झालाय. गेल्या अनेक वर्षांपासून ही जोडी एकत्र होती मात्र यांनी आता घटस्फोट घेण्याचे ठरवलेय.

बबिता आणि अय्यर यांची प्रेमकहाणी इतरांसाठी प्रेरणादायी मानली जात होती. त्यांच्या प्रेमाला भाषा, जात कशाचेच बंधन नव्हते. त्यांचे नाते आता तुटण्याच्या वाटेवर आहे. मात्र घाबरु नका हे केवळ सिरीयलमध्ये घडणार आहे. 

घटस्फोटावर बोलताना बबिता म्हणजेच मुनमुन दत्ता म्हणाल्या, बबिता आणि अय्यर यांच्या नात्यात दुरावा आलाय आणि बबितावा अय्यर नेहमी आनंदी रहावा असे वाटते यामुळे ती अय्यरला घटस्फोट देतेय. खऱ्या जीवनातही मी अशा अनेक जोडप्यांबद्दल ऐकलेय की अनेकदा गैरसमजामुळे त्यांचे नाते तुटते मात्र तुमचा तुमच्या जोडीदारावर किती विश्वास यावर नाते टिकत असते. ही कहाणी चांगली आहे आणि यामुळे प्रेक्षकांना यातून चांगला धडा मिळेल असे मुनमुन म्हणाली.