सलमान खान - संगिता बिजलानी पुन्हा येणार एकत्र!

सलमान खान आणि संगिता बिजलानी यांचं काही वर्षांपूर्वीचं नातं जगजाहीर आहे. नुकतंच हे दोघे मुंबईच्या हिंदुजा हॉस्पीटलच्या बाहेरही एकत्र दिसले होते... आणि आता लवकरच ही जोडी मोठ्या पडद्यावरही दिसणार असल्याचं समजतंय.

Updated: Apr 6, 2016, 01:58 PM IST
सलमान खान - संगिता बिजलानी पुन्हा येणार एकत्र!

मुंबई : सलमान खान आणि संगिता बिजलानी यांचं काही वर्षांपूर्वीचं नातं जगजाहीर आहे. नुकतंच हे दोघे मुंबईच्या हिंदुजा हॉस्पीटलच्या बाहेरही एकत्र दिसले होते... आणि आता लवकरच ही जोडी मोठ्या पडद्यावरही दिसणार असल्याचं समजतंय.

३० मार्च रोजी सलमानची बहिण अर्पिता खान हिनं एका मुलाला - अहिलला जन्म दिला. याच बाळाला पाहण्यासाठी सलमान - संगिता हॉस्पीटलमध्ये एकत्र दाखल झाले होते. त्यानंतर या दोघांबद्दल पुन्हा एकदा चर्चा सुरू झालीय. 

आपल्या खाजगी आयुष्यात दोघांचेही मार्ग वेगवेगळे झालेत. पण, हे दोघे मोठ्या पडद्यावर मात्र पुन्हा एकत्र दिसणार असल्याच्या चर्चांणा उधाण आलंय. 

तेलगु सिनेमा 'क्षणम्'च्या हिंदी रिमेकमध्ये सलमान - संगिता एकत्र दिसू शकतात अशी चर्चा आहे. प्रोड्युसर साजिद नाडियाडवाला यांनी या सिनेमाच्या रिमेकचे हक्कही खरेदी केल्याचं समजतंय.  

या सिनेमात एका अशा पुरुषावर आधारलेली आहे, ज्याच्याकडे त्याची एक्स-गर्लफ्रेंड आपल्या किडनॅप झालेल्या मुलीला वाचवण्यासाठी मदत मागायला येते.