दुबई : बॉलीवूडची अभिनेत्री शिल्पा शेट्टी आपल्या फिटनेसच्या बाबतीतही ओळखली जाते, जुबईत एक्स योगा फेस्टिवलमध्ये ती सहभागी होणार आहे.
शिल्पा शेट्टी काही दिवसांपूर्वी योगगुरू बाबारामदेव यांच्यासोबत योग करतांना पुन्हा एकदा चर्चेत आली होती.
शिल्पाचे योग प्रशिक्षक सुनील सिंह यांच्यासोबत दुबईत १९ फेब्रुवारी रोजी शिल्पा योगा करताना दिसणार आहे.
शिल्पाने यावर बोलताना म्हटलं आहे, मी समजू शकते की, अशा प्रकारचं व्यासपीठ हे व्यायाम आणि प्रसार-प्रदर्शनसाठी अत्यंत उपयुक्त आहे. मला याचा आनंद आहे की, या माध्यमातून मला जगभरातील दर्शकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल.