परिणीती चोपडाच्या आकर्षक 'बॉडी शेप'चं रहस्य काय? जाणून घ्या...

आपल्या वजनाकडे आणि फिगरकडे अभिनेत्रींचं जरा जास्तच लक्ष असतं... यासाठी त्या प्रचंड मेहनतही करायला तयार असतात... आणि पैसे खर्च करायलाही त्या मागे-पुढे पाहत नाहीत. आता पाहा ना परिणीती चोपडाही तेच करतेय. 

Updated: Sep 5, 2015, 04:47 PM IST
परिणीती चोपडाच्या आकर्षक 'बॉडी शेप'चं रहस्य काय? जाणून घ्या... title=

मुंबई : आपल्या वजनाकडे आणि फिगरकडे अभिनेत्रींचं जरा जास्तच लक्ष असतं... यासाठी त्या प्रचंड मेहनतही करायला तयार असतात... आणि पैसे खर्च करायलाही त्या मागे-पुढे पाहत नाहीत. आता पाहा ना परिणीती चोपडाही तेच करतेय. 

परिणीतीनं सध्या आपलं वजन कमालीचं घटवलेलं दिसतंय. पण, परिणीतीचं हे वजन केवळ वर्कआऊटनं आणि डाएटनं कमी केलेलं नाही.... तर यासाठी तीनं 'डिटॉक्स प्रोगाम'चीही मदत घेतली, असं 'डीएनए' या वृत्तपत्रानं म्हटलंय. १० किलो वजनासाठी (घटवण्यासाठी) तब्बल १० लाख रुपये परिणीतीनं मोजल्याचं सांगण्यात येतंय.

हा स्पेशल 'डिटॉक्स प्रोगाम' ऑस्ट्रियामध्ये केला जातो. यामध्ये, कोणत्याही ऑपरेशनची आवश्यकता नसते. पण, या प्रोग्राममुळे लोकांना एक चांगला बॉडी शेप मिळण्यास मदत होते, असा दावा केला जातोय.

या प्रोग्रामसाठी व्यक्तीला आपल्या काही टेस्ट कराव्या लागतात. त्यानुसार सहा महिन्यांसाठी डाएट चार्टही बनवला जातो... आणि तुम्हाला तो फॉलोही करावा लागतो. 

उल्लेखनीय म्हणजे, या डिटॉक्स प्रोग्रामच्या १५-३० दिवसांच्या कोर्ससाठी ५ ते १० लाख रुपयांपर्यंतचा खर्च येतो. 

केवळ परिणीतीच नाही तर अर्जुन कपूर, आदित्य चोपडा, रानी मुखर्जी हे सेलेब्सदेखील हा डाएट फॉलो करताना दिसतात. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.