फोटो : सलमानच्या लग्नाच्या बातम्यांवर शिक्कामोर्तब

बऱ्याच दिवसांपासून दबंग स्टार सलमान खान आणि लुलियाच्या नियोजित लग्नाच्या बातम्या तुमच्या कानावर पडल्या असतील. पण, या बातम्यांवर शिक्कामोर्तब करणारा एक फोटो समोर आलाय. 

Updated: May 12, 2016, 01:05 PM IST
फोटो : सलमानच्या लग्नाच्या बातम्यांवर शिक्कामोर्तब title=

मुंबई : बऱ्याच दिवसांपासून दबंग स्टार सलमान खान आणि लुलियाच्या नियोजित लग्नाच्या बातम्या तुमच्या कानावर पडल्या असतील... पण, या बातम्यांवर शिक्कामोर्तब करणारा एक फोटो समोर आलाय. 

लवकरच सलमान विवाहबंधनात अडकणार... अशा मथळ्यांखालच्या बातम्या वाचून तुम्हाला अगोदर अफवा वाटल्या असतील... पण, आता मात्र हा फोटो पाहून तुम्हाला याची खात्री पटणार आहे. 

नुकतीच, सलमानची नियोजित वधू लुलिया वंतूर ही सलमान आणि त्याची आई सलमा खान यांच्यासोबत विमानतळावर दिसली. 

इतकंच नाही, तर सलमाननं नाही तर चक्क लुलियानं सलमा यांच्या हाताला पकडलं होतं... आणि ती त्यांची काळजीही घेत होती. आता सलमानच्या चाहत्यांना उत्सुकता लागलीय ती केवळ 'त्या' तारखेची...