पुणे फिल्म फेस्टिव्हलमध्ये सीमा देव आणि अपर्णा सेन यांना जीवनगौरव

 १५ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री अपर्णा सेन आणि ज्येष्ठ अभिनेत्री  सीमा देव यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती महोत्सवाचे संचालक जब्बार पटेल यांनी सांगितले. 

Updated: Jan 9, 2017, 08:30 PM IST
 पुणे फिल्म फेस्टिव्हलमध्ये सीमा देव आणि अपर्णा सेन यांना जीवनगौरव  title=

पुणे  :  १५ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री अपर्णा सेन आणि ज्येष्ठ अभिनेत्री  सीमा देव यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती महोत्सवाचे संचालक जब्बार पटेल यांनी सांगितले. 

संगीत क्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल प्रख्यात तबला वादक उस्ताद झाकीर हुसेन यांना एस.डी. बर्मन आंतरराष्ट्रीय क्रिएटिव अवार्ड जाहीर झाला

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 12 ते 19 जानेवारी दरम्यान पार पडणार आहे. 

पिफ स्पर्धात्मक विभागात निवड झालेल्या मराठी चित्रपटांची घोषणा चित्रपट खालीलप्रमाणे -

डॉक्टर रखमाबाई - दिगदर्शक – अनंत नारायण महादेवन
लेथ जोशी - दिगदर्शक- मंगेश जोशी
व्हेंटीलेटर - दिगदर्शक - राजेश मापुस्कर
एक ते चार बंद - दिगदर्शक – अपूर्वा साठे
दशक्रिया - दिगदर्शक – संदीप भालचंद्र पाटील
घुमा - दिगदर्शक – महेश रावसाहेब काळे
नदी वाहते - दिगदर्शक – संदीप सावंत