मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत आणि अंकिता लोखंडे यांच्यातील ब्रेकअपची चर्चा सोशल मीडियावर सुरु असतानाच आणखी एक वृत्त हाती आलेय. अंकिताने चक्क सुशांतला घराबाहेर काढले. त्यामुळे त्याला हॉटेलमध्ये राहावे लागले.
सुशांची गर्लफ्रेंड अंकिता यांच्यात बिनसल्याच्या बातम्या आहे. त्यानंतर आमच्यात ब्रेकअप झाले नसल्याचे अंकिताने म्हटले होते. मात्र, आता डीएनएने दिलेल्या वृत्तानुसार सुशांतला अंकिताने चक्क घराबाहेर काढले. अंकिताचे बांद्रा येथे घर आहे. या घरातून सुशांतला तिने बाहेर काढल्याने तो जुहूतील एका हॉटेलमध्ये शिफ्ट झालाय.
सुशांत मोठ्या पडद्यावर कॅप्टन कुल महेंद्रसिंग धोनीची भूमिका साकारत आहे. या सिनेमाचे नाव आहे, 'एमएस धोनी : द अनटोल्ड स्टोरी' एक दिवस आधी अंकिताना ब्रेकअप झाल्याच्या वृत्ताला अफवा असल्याचे म्हटले होते. मुंबई मिररला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिने हे म्हटले होते. आमचे सहा वर्षांपासून संबंध आहेत. आम्ही नेहमी एकमेकांसोबत राहू. मी सुशांतवर कोणत्याही अटीशिवाय प्रेम करीत आहे आणि करत राहणार.
दरम्यान, सुशांत सिनेमाच्या शुटिंगमुळे तो अंकिताला वेळ देत नाही. तसेच अभिनेत्री परिणीती चोप्रा हिच्याशी जवळीक वाढत असल्याने ब्रेकअप झाल्याचे म्हटले जात आहे. मात्र, ब्रेकअपबाबत अधिकृत दुजोरा मिळत नाही.
तर सुशांत आणि अंकिता यांचा विवाह या वर्षात डिसेंबरला निश्चित होणार होते. मात्र, दोघांनी लग्नाचा विचार सध्या थांबवला आहे. सुशांत आणि अंकिता झी टीव्हीच्या 'पवित्र रिश्ता' या मालिकेतून हिट जोडी ठरली आणि पुढे आली.