२०० कोटींची कमाई करूनही बाहुबली २ ने तोडले नाही शाहरुखचे रेकॉर्ड

 गेल्या २८ एप्रिल रोजी जगभरात रिलीज झालेल्या एसएस राजमौली याच्या बाहुबलीने २०० कोटींचा आकडा दोन दिवसात पार केला पण त्याला शाहरुख खानचे रेकॉर्ड तोडण्यात अपयश आले आहे. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: May 1, 2017, 05:38 PM IST
 २०० कोटींची कमाई करूनही बाहुबली २ ने तोडले नाही शाहरुखचे रेकॉर्ड

मुंबई :  गेल्या २८ एप्रिल रोजी जगभरात रिलीज झालेल्या एसएस राजमौली याच्या बाहुबलीने २०० कोटींचा आकडा दोन दिवसात पार केला पण त्याला शाहरुख खानचे रेकॉर्ड तोडण्यात अपयश आले आहे. 

दोन दिवसात २०० कोटी रुपयांचा गल्ला जमविणारा तो पहिला चित्रपट झाला आहे. असे कोणत्याही चित्रपटाने केले नाही आहे. 

या चित्रपटाने भारतीय चित्रपट इतिहासातील अनेक विक्रम उद्धवस्त केले आहेत. पण या चित्रपटाला शाहरूखच्या चित्रपटाचा विक्रम तोडता आलेला नाही. 

बाहुबली २ ने आमीर खानचा दंगल आणि सलमान खानच्या सुल्तानला कमाईत मागे टाकले. पण शाहरुखच्या हॅप्पी न्यू इअरला मागे टाकण्यात बाहुबलीला अपयश आले आहे. 

बाहुबलीने हिंदी भाषिक क्षेत्रात ४१ कोटी रुपयांची कमाई केली आहे. आमिर खानच्या दंगलने २९.७८ कोटी,  सलमानच्या सुल्तानने ३६.५४ कोटी कमाविले आहेत.  पण शाहरूखच्या हॅपी न्यू इअरने ४२.६१ कोटींची पहिल्या दिवशी होती. बाहुबली १ कोटी ६१ लाख रुपये कमी पडले आहे आहेत.