बॉलीवूड तारका प्रिती झिंटाचं 'गोदान'

दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना दुभत्या गायी देऊन आणि आर्थिक मदत करून बॉलीवूड तारका प्रिती झिंटा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यातील निहाळे गावातील २० शेतकर्‍यांना प्रिटीने आर्थिक मदत दिली आहे. तसेच त्यांना दुभत्या गाईही दिल्या आहेत, येथील पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई लक्षात घेऊन प्रितीने टँकरने पाणी पुरविण्याचे आश्वासनही दिले असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.

Updated: Apr 7, 2015, 05:11 PM IST
बॉलीवूड तारका प्रिती झिंटाचं 'गोदान' title=

नाशिक : दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना दुभत्या गायी देऊन आणि आर्थिक मदत करून बॉलीवूड तारका प्रिती झिंटा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यातील निहाळे गावातील २० शेतकर्‍यांना प्रिटीने आर्थिक मदत दिली आहे. तसेच त्यांना दुभत्या गाईही दिल्या आहेत, येथील पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई लक्षात घेऊन प्रितीने टँकरने पाणी पुरविण्याचे आश्वासनही दिले असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.

दानिश मर्चंट या चित्रपट व्यावसायिकाकडे प्रीतीने दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांसाठी कांही मदत करण्याची इच्छा बोलून दाखविली होती. मर्चंट यांच्याकडे काम करणारे संतोष दराडे हे निहाळे गावचे आहेत. त्यांनी त्यांच्या भागातील दुष्काळाबाबत मर्चंट यांना माहिती दिली. 

ती मर्चंट यांनी प्रितीला दिली तेव्हा दोन आठवड्यापूर्वीच प्रितीने गावातील २० शेतकर्‍यांना प्रथम आर्थिक मदत पाठविली आणि त्यानंतर स्वतः गावाला भेट देऊन दुभत्या गाईही दिल्या तसेच शेतकर्‍यांची परिस्थितीही जाणून घेतली. 

या भेटीची माहिती तिने कटाक्षाने प्रसार माध्यमांपासून लपविली होती हे विशेष. मात्र प्रितीने पत्रकार दूर जाईपर्यंत गाडीतच थांबण्याचा निर्णय घेतला आणि पत्रकार गेल्यानंतरच शेतकर्‍यांशी चर्चा केल्याने प्रसारमाध्यमांना उपलब्ध होऊ शकली नाही. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.