10 जून... शाहीद-मीराच्या लग्नाची तारीख फायनल?

अभिनेता शाहीद कपूर लवकरच विवाह बंधनात अडकणार, ही बातमी कळताच अनेक तरुणींची हृदय तुटली... आता, तर शाहीदच्या लग्नाची तारीखही ठरल्याचं समजतंय. 

Updated: Apr 7, 2015, 04:02 PM IST
10 जून... शाहीद-मीराच्या लग्नाची तारीख फायनल? title=

नवी दिल्ली : अभिनेता शाहीद कपूर लवकरच विवाह बंधनात अडकणार, ही बातमी कळताच अनेक तरुणींची हृदय तुटली... आता, तर शाहीदच्या लग्नाची तारीखही ठरल्याचं समजतंय. 

मूळची दिल्लीची मीरा राजपूत हिच्यासोबत शाहीद जून महिन्यात सप्तपदी चालणार असल्याचं समजतंय. मिळालेल्या माहितीनुसार, शाहीद आणि मीराच्या कुटुंबीयांचं १० जून रोजी हा लग्न समारंभ आयोजित करण्यावर एकमत झालंय. याचसोबत, या लग्नाची तयारीही सुरु झालीय. 

या वर्षाच्या शेवटपर्यंत आपण विवाह बंधनात अडकणार असल्याचं स्वत: शाहीदनं म्हटल्यानंतर त्याच्या अफेअर्स आणि लग्नाबद्दल उठणाऱ्या विविध वावड्यांना ब्रेक लागलाय.

शाहीद आणि मीराच्या लग्न समारंभात केवळ त्यांचे कुटुंबीय आणि जवळच्या मित्र परिवाराचाच समावेश असेल, असं म्हटलं जातंय. शाहीदच्या फिल्म इंडस्ट्रीतल्या मित्रांसाठी मात्र एक ग्रँड रिसेप्शनचं आयोजन करण्यात येईल.

शाहीदच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १० जून ही तारीख केवळ एक ऑप्शन आहे. पण, तारखेवर अजून विचार विनिमय सुरू आहे. पण, लग्नाची तयारी मात्र जोरात सुरू आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.