लंडन : अभिनेत्री प्रियंका चोप्रा पुन्हा एकदा जगातील सर्वात सेक्सी आशियाई महिलेचा किताब जिंकला आहे.
गेल्यावर्षी या किताब कॅटरीना कैफने पटकावला होता. ३२ वर्षीय प्रियंकाने ब्रिटनमधील साप्ताहिक 'ईस्टर्न आई' तर्फे करण्यात आलेल्या वार्षिक मतदानात ५० उम्मेदवारांच्या सूचीत पहिले स्थान पटकविण्यात यश मिळविलेय.
प्रसिद्ध टिव्ही अभिनेत्री दृष्टी धामी या स्पर्धेत सर्वात पुढे होती. मात्र, कमी अंतराने तिचा नंबर हुकला ती दुसऱ्या स्थानावर राहिली. तर तिची सहकारी सान्या ईरानी तिसऱ्या स्थानावर राहिले. तर गतवर्षीची विजेयती कॅटरीना कॅफला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले.
सेक्सी महिला किताब पटकविल्यानंतर प्रियंकाने आनंद व्यक्त केलाय. मात्र, मी यासाठी लायक आहे की नाही, हे मला माहीत नाही. मी काय केले याबाबत मला काहीही माहीत नाही. मला चांगले वाटत आहे. जगातील लोकांनी मतदाना करुन निवड केली आहे. मतदान करणाऱ्यांचे प्रेम यातून दिसून येत आहे. त्यांचे प्रेम असेच पुढे राहिल, असे प्रियंकाने म्हटलेय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.