अमेरिकेच्या टॉप १० सेक्सी टीव्ही अभिनेत्रींमध्ये प्रियंका चोपडा

 चर्चित अमेरिकन टीव्ही शो 'क्वांटिको'मध्ये लीड रोल करणारी बॉलीवूड अभिनेत्री प्रियंका चोपडाने अमेरिकन प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. 'क्वांटिको'च्या ट्रेलरमध्ये प्रियंकाच्या अभिनयाला खूप पसंती मिळाली आहे. 

Updated: Aug 27, 2015, 09:21 PM IST
अमेरिकेच्या टॉप १० सेक्सी टीव्ही अभिनेत्रींमध्ये प्रियंका चोपडा  title=

न्यू यॉर्क :  चर्चित अमेरिकन टीव्ही शो 'क्वांटिको'मध्ये लीड रोल करणारी बॉलीवूड अभिनेत्री प्रियंका चोपडाने अमेरिकन प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. 'क्वांटिको'च्या ट्रेलरमध्ये प्रियंकाच्या अभिनयाला खूप पसंती मिळाली आहे. 

अधिक वाचा : 'आशिकी'च्या अनुने सांगितले खाजगी आयुष्यातील गुपिते

न्यू यॉर्कच्या मॅडन स्वेअर आणि बसेसपर्यंत अनेक ठिकाणी क्वांटिको च्या प्रमोशनसाठी प्रियंका चोपडाचे पोस्टर झळकत आहेत. आता या इंटरनॅशनल स्टारने आपल्या करिअरमध्ये आणखी एक मैलाचा दगड पार केला आहे. 

प्रियंकाच्या टॅलेंट आणि सुंदरतेमुळे तिला अमेरिकेतील टॉप १० सेक्सी अभिनेत्रींमध्ये स्थान मिळवले आहे. त्याचा या यशाबद्दल ट्विटरवर तिला शुभेच्छा दिल्या जात आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.