बाळाचा बाप ब्रम्हचारी, लग्नाआधीच हा अभिनेता बनला पिता!

लग्नापूर्वी बाळाला जन्म देणाऱ्या अनेक अभिनेत्री एव्हाना तुम्हाला माहीत असतील... पण, लग्नापूर्वीच एका बाळाचा बाप बनणारा आणि उघडपणे ते जाहीर करणारा अभिनेता तुम्हाला माहीत आहे का?

Updated: Feb 11, 2016, 10:26 PM IST
बाळाचा बाप ब्रम्हचारी, लग्नाआधीच हा अभिनेता बनला पिता! title=

नवी दिल्ली : लग्नापूर्वी बाळाला जन्म देणाऱ्या अनेक अभिनेत्री एव्हाना तुम्हाला माहीत असतील... पण, लग्नापूर्वीच एका बाळाचा बाप बनणारा आणि उघडपणे ते जाहीर करणारा अभिनेता तुम्हाला माहीत आहे का?

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'एअरलिफ्ट' या सिनेमात दिसलेला पूरब कोहली तुम्हाला आठवत असेलच... २०१७ मध्ये पूरब आपल्या होणाऱ्या वधूशी म्हणजेच लकी पायटॉन हिच्याशी विवाहबद्ध होणार आहे... परंतु, या जोडप्यानं लग्नाआधीच एका बाळला जन्म दिलाय.


 लकी पायटॉन, पूरब कोहली आणि इनाया

 

'इनाया' असं या बाळाचं नामकरण करण्यात आलंय. दोघांनीही आपल्या या निर्णयानं आपण खूश असल्याचं सांगत आपला एक फॅमिली फोटोही सोशल मीडियावर शेअर केलाय. 

पूरब आणि लकी यांचा विवाह पुढच्या वर्षी भारतातच होणार असल्याचं सांगितलं जातंय. सध्या पूरब आपला वेळ लकी आणि इनायासोबत लंडनमध्ये घालवत आहे. लवकरच, पूरब आपल्या कुटुंबाला भारतात घेऊन येणार आहे.