'रईस'ची आमिरच्या 'दंगल'ला धोबीपछाड!

आंतरराष्ट्रीय स्तरावर शाहरुख खानच्या फॅन्सची संख्या वाढतच चालल्याचं दिसतंय. त्यामुळेच की काय 'रईस' या सिनेमानं पहिल्या दोन दिवसांत केवळ देशातच नाही तर परदेशातही चांगलीच कमाई केल्याचं दिसतंय.

Updated: Jan 27, 2017, 08:28 PM IST
'रईस'ची आमिरच्या 'दंगल'ला धोबीपछाड! title=

मुंबई : आंतरराष्ट्रीय स्तरावर शाहरुख खानच्या फॅन्सची संख्या वाढतच चालल्याचं दिसतंय. त्यामुळेच की काय 'रईस' या सिनेमानं पहिल्या दोन दिवसांत केवळ देशातच नाही तर परदेशातही चांगलीच कमाई केल्याचं दिसतंय.

इतकंच नाही तर या सिनेमानं कमाईच्या बाबतीत आमिर खानच्या 'दंगल'लाही धोबीपछाड दिलीय.  
 
राहुल ढोलकिया दिग्दर्शित 'रईस'नं अमेरिकेच्या बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी तब्बल 3,47,603 अमेरिकन डॉलर्सची कमाई केली. तर आमिरच्या 'दंगल'नं आपल्या रिलीजच्या पहिल्या दिवशी 3,28,227 अमेरिकन डॉलर्सची कमाई केली होती.

दंगल हा सिनेमा हरियाणाचे कुस्तीपटू महावीर सिंग फोगाट आणि त्यांच्या मुली गीता-बबिता फोगाट यांच्या जीवनावर आधारित होती... हा सिनेमा आत्तापर्यंत सर्वात जास्त कमाई करणारा सिनेमा ठरलाय. परंतु, परदेशात पहिल्याच दिवशी बक्कळ कमाई करण्याच्या बाबतीत मात्र शाहरुखनं आमिरला मागे टाकलंय.