प्रत्युषाच्या मृत्यूबाबत खळबळजनक आरोप

टीव्ही अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीच्या मृत्यूविषयी रोज नव्या गोष्टी समोर येत आहेत.

Updated: Apr 8, 2016, 06:39 PM IST
प्रत्युषाच्या मृत्यूबाबत खळबळजनक आरोप title=

मुंबई: टीव्ही अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीच्या मृत्यूविषयी रोज नव्या गोष्टी समोर येत आहेत. प्रत्युषाचा बॉयफ्रेंड राहुल राज सिंगवर अटक व्हायची टांगती तलवार कायम आहे. कोर्टानंही राहुलचा जामिन अर्ज फेटाळून लावला आहे, त्यामुळे त्याला कधीही अटक व्हायची शक्यता आहे. 

यामध्येच आता राहुलचे आधीचे वकील नीरज गुप्ता यांनी त्याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. राहुलकडे काही काम नव्हतं, पण तरी त्याला ड्रग्ज आणि दारुसाठी 15 ते 20 हजार रुपये लागायचे. हे पैसे तो कुठून आणायचा असा प्रश्न नीरज गुप्तांनी विचारला आहे. 

प्रत्युषा आणि राहुल हे दोघं ड्रग्ज घ्यायचे, पण राहुल जास्त प्रमाणात ड्रग्जचं सेवन करायचा. राहुलला भेटल्यानंतरच प्रत्युषा ड्रग्जच्या आहारी गेली, असा दावाही नीरज गुप्तांनी केला आहे. 

आपले ड्रग्जचे शौक पुर्ण करण्यासाठी राहुल मुलींबरोबर मैत्री करायचा, या मुलींचे पैसे संपले की त्यांना सोडून द्यायचा असंही गुप्ता म्हणाले आहेत. 

आत्महत्या करण्याआधी प्रत्युषा दारू प्यायली होती, मग दारूच्या नशेत तिनं आत्महत्या कशी केली, हा सुनियोजीत खून आहे, असा आरोपही नीरज गुप्तांनी केला आहे.