रणदीपला मिळाली त्याची ड्रिमगर्ल

जिस्म २, हायवे, सरबजीत यांसारख्या हीट सिनेमांमुळे अभिनेता रणदीप हुड्डा हा सध्या बॉलिवूडच्या टॉप सेलिब्रिटीजमध्ये येऊ लागला आहे. 

Updated: May 27, 2016, 06:18 PM IST
रणदीपला मिळाली त्याची ड्रिमगर्ल title=

मुंबई : जिस्म २, हायवे, सरबजीत यांसारख्या हीट सिनेमांमुळे अभिनेता रणदीप हुड्डा हा सध्या बॉलिवूडच्या टॉप सेलिब्रिटीजमध्ये येऊ लागला आहे. 

रणदीपच्या आईला मात्र त्याचे लग्न करायचे होते. रणदीपने नुकताच त्याच्या ड्रिमगर्लचा फोटो सोशल मीडियावर अपलोड केलाय. पण ही ड्रिमगर्ल तुम्ही विचार करताय ती नाहीये हा! या ड्रिमगर्लशी तो लग्न करणार नसून तीला तबेल्यात ठेवणार आहे. वाटले ना तुम्हाला पण आश्चर्य!!! 

ही ड्रिमगर्ल दुसरी तिसरी कोणी नसून चक्क घोडी आहे. रणदीपला घोड्यांची फार आवड आहे म्हणूनच त्याने एका घोडीला आपली ड्रिमगर्ल म्हटले आहे.